Bacchu kadu : पुणे हिट अँड रन प्रकरणावर (Pune hit and run case) प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. डान्सबार, पब  यामध्ये जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा आहे. हे लोक पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरले आहेत. याचे अधिकारी आणि नेत्यांनी काहीच पडले नाही. मग बंधने कशी येणार? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी केलाय. घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते असेही कडू म्हणाले. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी आहे अशी परिस्थिती असल्याचे कडू म्हणाले.  ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?


पैशाच्या भरोशावर लोकशाही घेतली जात असेल, मते खेचली जात असतील तर सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या मरणाला काही अर्थ नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. बेदरकारपणे कार चावलणं चुकीचं आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरल्याचे बच्चू कडू म्हणाले.


पुण्यातील नेमकी घटना काय?


पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. यानंतर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीय. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आलीय. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पब मालकांवरही गुन्हा दाखल करत त्यांनाही अटक केलीय.  या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेवर आता बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. 


लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी अभ्यास केला नाही, चार तारखेला सगळं स्पष्ट होईल


लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी तेवढा अभ्यास केला नाही. घोडा मैदान जवळ आहे. चार तारखेला सगळं स्पष्ट होईल. तुमच्याकडे सर्वे असतात. अभ्यास असतो ते तुम्ही दाखवा, आम्ही मत मागणारी लोक आहोत. मतं देणारे लोक आहोत. सर्व्हे करणारे तुमच्याकडे असतात. त्यामुळं तुम्हीच सांगा असे बच्चू कडू म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवणे, धमकीचा गुन्हा दाखल