Babanrao Taywade on Maratha Reservation : सरसकट मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आमचा विरोध आहे. सध्या तरी सरकार आमच्या आरक्षणाला धक्का लावतांना दिसत नाही. मात्र ज्या दिवशी आम्हाला वाटेल कि जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या दबावामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागत आहे. तेव्हा आम्ही थेट रस्त्यावर उतरूनलढादेऊ, अशीभूमिकाघेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकरला इशारा दिलाआहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी दीड तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्याने जरांगे उपोषणावर ठाम राहिले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताच सरकारची मोठी धावपळ उडाली असून, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने एक विशेष अधिकृत मसुदा म्हणजेच ड्राफ्ट (Draft) तयार केला आहे. सरकारचे शिष्टमंडळ हा मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. याविषयीबोलताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीभाष्यकरतप्रतिक्रियादिलीआहे.
Babanrao Taywade on Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनांनंतर मराठवाड्यातील 8 हजार नवीन नोंदी सापडल्या
मनोज जरांगे हेज्या 58 लाख कुणबी नोंदीचा दावा करतात, त्या शिंदे समितीला सापडलेल्या नोंदी मनोज जरांगे यांच्या आधीच्या आहे. ज्यांना आधीच ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनांनंतर मराठवाड्यातील 8 हजार नवीन नोंदी सापडल्या असल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकीय आहे कि नाही, हे त्यांना विचारावे लागेल. मी त्यावर भाष्य करणार नसल्याचेही बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना सरकारच्या आश्वासनांचे ड्राफ्टमधील मुद्दे
सरकारने तयार केलेल्या या ड्राफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आश्वासने देण्यात आलेली आहेत. त्यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- मराठा आरक्षण कक्ष पुढील एक महिन्यात सुरू करण्यात येईल.
- नोंदी शोधणे, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी एक हेल्पलाइन 8 दिवसात सुरू करणार
- कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी sop तयार केली आहे.
- आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल.
- कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल.
मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय? (Manoj Jarange Patil Demands)
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
आणखी वाचा
