Baba Siddique Murder Case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) नवीन माहिती समोर आली आहे. यापूर्वी आरोपींनी बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी राम कनोजिया याने चौकशीत याबाबतचा खुलासा केला आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अंबरनाथ, डोंबिवली आणि पनवेल परिसरातून आणखी 5 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये नितीन सप्रे (वय 32 वर्ष डोंबिवली) संभाजी पारधी (वय 43 पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राम कनोजिया (44), प्रदीप ठोंबरे (37) आणि चेतन पारधी (27) यांना अंबरनाथ येथून अटक करण्यात आली आहे.
शुभम लोणकरने दिली होती हत्येची सुपारी
चौकशीत आरोपी राम कनोजियाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला शुभम लोणकर याने त्याला आणि नितीन सप्रेला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिली होती. राम कनोजिया हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काय प्रतिक्रिया उमटतील याची त्यांना कल्पना होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राम कनोजिया यांना हे कंत्राट घ्यायचे नव्हते, त्यामुळेच त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यानंतर शुभम लोणकरने सांगितले की, ते खूप झाले आणि त्यानंतर शुभम लोणकरने आपला विचार बदलला. शुभम लोणकरला माहीत होते की, उत्तर प्रदेशातील आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्याबात जास्त माहती नसेल. ते कमी पैशातही खून करायला तयार होतील. जेव्हा राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांनी हत्या करायला नकार दिला. त्यावेळी शुभमने हे काम उत्तर प्रदेशातील आरोपींना दिले. यामध्ये धर्मराज कश्यप, गुरनैल सिंग आणि शिवकुमार गौतम यांना हे काम देण्यात आले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्यासोबत झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना देखील मारण्याची सुपारी देण्यात आली होती. आरोपीने याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच दोघांनाही एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल त्याला ठार मारावे, असे आदेश देखील आरोपींना देण्यात आले होते. मात्र, सुदैवान झिशान सिद्दीकी या हल्ल्यातून बचावले.
महत्वाच्या बातम्या: