Sanjay Raut : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा पूर्वनियोजीत आहे. कोरोनाच्या संकटामुळं दौरा पुढे गेला होता. अयोध्येची जागा ही सर्वांना उर्जा आणि प्रेरणा देणारी असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राजकीय फायद्यासाठी अयोध्येची भूमी कधीच वापरणार नाही असेही राऊत  म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याला येण्याचा विचार केला होता असेही राऊत म्हणाले.  


आता राम भूमी उभी राहत आहे. आता कसलं राजकारण करताय. राजकीय फायद्यासाठी अयोध्येची भूमी वापरणार नाही असेही राऊत म्हणाले. ही पवित्र आणि मंगलमय जागा आहे. इथे फक्त श्रद्धेनं याव असेही राऊत म्हणाले. अयोध्येतीन सर्वांना उर्जा आणि प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. त्या ठिकाणी कोणतही राजकीय प्रदर्शन करमार नाही. 


वितुष्ट आणायचं हेच त्याचं हिंदुत्व, विरोधकांवर निशाणा


काही लोकांच्या राजकीय आयुष्यात विरोधच असतो. दुसऱ्यांचं चांगलं पाहायचं नाही, राज्याचं चांगलं पाहायच नाही. राज्यात कोणी काही चांगल करत असेल तर वितुष्ट आणायचे हेच त्यांच हिंदुत्व आहे. आम्ही त्याच्या पलीकडे पाहतो असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला. त्यांनी सहावी जागा जिंकली ठिक आहे. देशामध्ये लोक हरत असतात, त्यात एवढं विशेष काय असेही राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही एक जागा जिंकली गणिताच्या आकडेमोडीवर. पण त्या लोकांनी राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीची वेगळी यंत्रणा तयार केली आहे. माझ म्हणणं आहे की, ज्याला सर्वाधिक मतं मिळाली तो जिंकला पाहिजे. मलाही हरवण्याचा प्रयत्न झाला पण मी जिंकलो. आमच्याकडं मत असताना मी फक्त 42 मतांच्या कोट्यावर उभं राहिलो. माझं एक मत बाद केलं तरीही मी जिंकलो असे राऊत म्हणाले. विरोधक सुरक्षीत कुंडल घेऊन उभे होते.


पंतप्रधानांशी जिव्हाळ्याचे संबंध 


अयोध्येचा प्रवास हा मोठा प्रवास आहे. अनेक आमदारांची येण्याची इच्छा होती. पण विधान परिषदेच्या निवडणुकीमुळं काही आमदार येणार नाहीत. पण काहीजण येणार आहेत. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री संदिपान भुमरे हे अयोध्येला येत असल्याचे राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका कार्यक्रमात मुंबईत एकत्र येणार आहेत. याबाबतही राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, शासकीय कार्यक्रम आहे. तो राजशिष्टाचार असतो, तो मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आमचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. 
नात्यात आम्ही कधीही राजकीय भांडण आणलं नसल्याचे राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नेहमीच एकमेकांचा आदर करतात असंही त्यांनी सांगितलं.


...तर पंतप्रधानांचे स्वागत करु


पुढील दीड वर्षात 10 लाख नोकरीच्या संधी निर्माण करमार असल्याचं पंतप्रदान म्हणाले आहेत. यावर राऊत म्हणाले की, गेल्या 10 वर्षापासून आम्ही हे एकत आहोत. 10 लाख मिळू द्या, ही पंतप्रधानांची घोषणा खरी ठरली तर आम्ही त्यांचे स्वागतच करु असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. नोकऱ्या देण्याची घोषमा केली असेल आमि महाराष्ट्राच्या वाट्याला जर काही संधी येत असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्हाला बदनाम करण्याचं काम केल भाजपनं, त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. त्याचा छळ करायचे हे त्यांनी ठरवलं आहे.


महत्वाच्या बातम्या: