मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अॅक्सिस–इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार नागपुरात भाजपला एकहाती सत्ता मिळण्याची चिन्हं आहेत. 98 ते 110 च्या दरम्यान जागा मिळवत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला मागे टाकत नागपुरात भाजप एक नंबरचा पक्ष होण्याची चिन्हं आहेत.

एक्झिट पोलनुसार, 151 जागांच्या महापालिकेत भाजपला 98 ते 110 दरम्यान जागा मिळवत भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल असं भाकित वर्तवलं आहे. तर काँग्रेसच्या जागा 35 ते 41 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला केवळ 2 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

नागपूर-

भाजप-  98  ते 110
काँग्रेस- 35 ते 41
शिवसेना- 2 ते 4

इतर महापालिकांबाबत एक्झिट पोलचा अंदाज काय?

अॅक्सिस–इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवेसना-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेला 86 ते 92, तर भाजपला 80 ते 88 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 30 ते 34, मनसेला 5 ते 7 आणि राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज


मुंबई

शिवसेना– 86 ते 92
भाजप–  80 ते 88
काँग्रेस– 30 ते 34
मनसे– 5 ते 7
राष्ट्रवादी– 3 ते 6

ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज


अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, ठाणे महापालिकेत शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

ठाणे-

भाजप- 26 ते 33
शिवसेना- 62 ते 70
काँग्रेस- 2 ते 6
राष्ट्रवादी- 29 ते 34

अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं


अॅक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. इथेही भाजप मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. पुणे महापालिकेत भाजपला 77 ते 85 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील. तर शिवसेनेला 10 ते 13 जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता अॅक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. तसंच मनसेला 3 ते 6 आणि इतरांना 1 ते जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पुणे-

भाजप - 77 ते 85
काँग्रेस राष्ट्रवादी - 60 ते 66
शिवसेना- 10 ते 13
मनसे- 3 ते 6
इतर- 1 ते 3

अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?