ठाणे: ठाण्यावरुन गुजरातला जाणारा एलपीजी गॅस टँकर घाटातील वळणावर उलटला.  घोडबंदर रोडवर काजूपाडाजवळ हा अपघात झाला.  अपघातानंतर टँकर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत.


या अपघातामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माजीवडा ते घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सध्या काशिमीरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या मार्गावरुन प्रवास करणं टाळावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ही वाहतूककोंडी फोडण्याचं काम पोलिस युद्धपातळीवर करत आहेत.