ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा रिक्षाचालकाने 20 वर्षीय कॉलेज तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रिक्षाचालकाने तरुणीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
मागील एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ठाण्यातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सिकंदर निसार शेख असं 27 वर्षीय आरोपी रिक्षाचालकाचं नाव असून ठाणे नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तो ठाण्यातील राबोडी परिसरातला रहिवासी आहे..
मल्हार टॉकीजजवळ जाण्यासाठी या तरुणीने रिक्षा घेतली. पण आलोक हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर सिकंदरने तिला पाहून डोळा मारला. त्यामुळे दोघांमध्ये तुफान वादावादी झाली. यादरम्यान तिने रिक्षाचालकाच्या थोबाडीत मारली. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने शिवीगाळ करत तिचा हात मुरगळला, असं ठाणे नगर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
शेअर रिक्षात सहप्रवासी-रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग