औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीबाबत मुंबईत चर्चेच्या फेऱ्या रंगू लागल्या आहेत. मात्र तिकडे औरंगाबादेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेली युतीची पहिली बैठक फिसकटली आहे.

जिल्हा परिषदेसाठी भाजपने पहिल्या बैठकीत 36 जागा मागितल्या. मात्र शिवसेनेकडून त्याला स्पष्ट नकार देण्यात आला.

शिवसेना गतनिवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना 36 तर भाजपने 24 जागा लढवल्या होत्या.

मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच त्या जागा लक्षात घेऊन जागावाटप व्हावं अशी मागणी भाजपची आहे. पण शिवसेना जुन्याच फॉर्म्युल्यावर ठाम आहे.

औरंगाबाद जिल्यात 62 जिल्हापरिषद सर्कल आहेत.