औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी मारली असून यात महिलेचा  मृत्यू झाला आहे, तर चिमुकली बचावली आहे. आत्महत्या करणारी महिला पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक असल्याची माहिती आहे.

 
रसिका कालिदास फड असं महिलेचं नाव असून त्यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून चिमुकलीसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत सहा वर्षांची चिमुकली बालंबाल बचावली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सातारा परिसरातील पृथ्वीनगरात घडली.

रसिका यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा तिच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे. रसिका फड पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक होत्या तर त्यांचे पती कालिदास फड करमाड येथील राजीव गांधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. प्राध्यापक पती, नणंद, सासू यांच्या छळाला कंटाळल्याचा आरोप आहे.

 
ज्यावेळी या त्यांनी विहिरीत उडी मारली तेव्हा पेपर वाटणाऱ्या मुलानं आवाज ऐकला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे त्यांची मुलगी वाचू शकली, मात्र रसिका यांचा मृत्यू झाला.