Aundha Nagnath: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायत निवडणूक साठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळं सर्व पक्षांच्यांवतीनं प्रचारासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (ShivSena), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे सर्व पक्ष एकमेकांच्या परस्परविरोधी म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे. यामुळं या दोन्ही नगरपंचायतमधील निवडणूक ही चौरंगी होणार असल्याचे दिसून येत आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पाणी सेनगाव नगरपंचायत निवडणूक साठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळं सर्व पक्षांच्या वतीने प्रचारासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढताना दिसून येत आहे. सेनगाव नगरपंचायत मध्ये एकूण 13 जागा साठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये 13 जागांसाठी 54 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यासह शिवसेना आमदार संतोष बांगर आणि विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव हे चारही आमदार प्रत्येक घरी भेट घेऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसून येत आहेत. परंतु, या संपूर्ण प्रचारामध्ये सर्वांचे लक्ष वेधणारे ठरल्यात ते म्हणजे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी विधान परिषद आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यानंतर ही जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षाची जिल्हाभरातील जबाबदारी प्रज्ञा सातव यांच्यावर सोपविण्यात आले आहे. औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची प्रचाराची जबाबदारी चोखपणे प्रज्ञा सातव पार पाडताना दिसून येत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha