औंध : तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर साताऱ्याच्या गजराजला मथुरेला नेण्यासाठी गाडीत चढवण्यात आलं आहे. 'पेटा' संस्थेच्या याचिकेनंतर गजराज नावाच्या हत्तीला औंधमधून मथुरेला नेण्याचे आदेश देण्यात आले.


औंध संस्थानाच्या गजराजला निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनीही सोहळा आयोजित केला. हारतुरे घातले, रांगोळ्या काढल्या. पण जेव्हा प्रत्यक्षात ट्रकमध्ये बसण्याची वेळ आली, तेव्हा गजराज त्या गाडीत चढायला तयार नव्हता.

गजराजला जायचे नाही, तर त्याला औंधमध्येच ठेवा अशी मागणी गावकऱ्यांनी उचलून धरली. तणाव वाढल्यामुळे प्रशासन आणि पोलिस अखेर गजराजला घेऊन जंगलात गेले आणि तिथे कोणत्याही अडथळ्याविना गजराजला गाडीत बसवण्यात आलं.

गजराजच्या देखभालीत हलगर्जी केल्याचा आरोप करत पेटा या संस्थेनं याचिका दाखल केली होती. त्यानुसार गजराजची रवानगी मथुरेच्या एलिफंट केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.