अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 07:47 PM (IST)
नागपूर : अॅट्रोसिटी कायदा सरसकट रद्द करण्याची मागणी अयोग्य असून, या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना तितकीच कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्याची गरज आहे, असं परखड मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. आज नागपुरात संत तुकडोजी महाराज विद्यापीठातल्या सांस्कृतिक आणि क्रीडा पुरस्कार वितरणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मराठा समाजाचा आक्रोश आणि अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी ही 'सैराट'मुळे वाढीला लागलेली असू शकते, असं विधान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंबाबत मात्र नागराज यांनी कोणतंही भाष्य केलं नाही.