Mumbai Local Train Accident : मुंबईतून जीवघेण्या लोकलमधील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज (9 जून) ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून 8 ते 9 प्रवासी खाली पडले. यामध्ये 8 पुरुष, 1 महिला यांचा समावेश आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 8 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण ट्रेनच्या गेटवर बसले होते. कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. ऑफिसला जाताना सकाळी प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे.

रेल्वे सीपीआरओ म्हणतात, दोन गाड्यांचे प्रवासी एकमेकांना धडकले

मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील धनराज नीला म्हणाले, 'हा अपघात मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन/फास्ट लाईनवर झाला. कसाराहून येणारी लोकल ट्रेन आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधील प्रवासी फूटबोर्डवरून प्रवास करताना एकमेकांना धडकले, ज्यामुळे काही लोक पडले.'कसारा येथे जाणाऱ्या मुंबई ट्रेनच्या गार्डने सांगितले की मुंबई स्टेशनजवळ काही प्रवासी ट्रेनमधून पडले. मृतांची ओळख पटवली जात आहे. सर्व मृतांचे वय 30 ते 35 दरम्यान आहे. या अपघातानंतर, रेल्वे बोर्डाने नवीन रॅकमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेनमधील सर्व दरवाजे आपोआप बंद होतील.

स्वप्नील नीला पुढे म्हणाले की, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. ज्यामध्ये दोन्ही बाजूनं लोकल जात असताना फूटओव्हरवर लोकं उभे असताना पडण्याची पहिलीच घटना आहे. सीसीटीव्ही होते की नाही, लोकलमध्ये गर्दी किती होती? यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. या संदर्भात चौकशी नक्कीच होईल. अपघातग्रस्तांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणं महत्त्वाचं होते. काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होती असं कळतंय, यासंदर्भात देखील माहिती घेत आहोत आणि तपास केला जात असल्याचे ते म्हणाले.

ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत 

त्यांनी पुढे सांगितले, प्रवाशी धडकून पडलेल्या या दोन्ही गाड्या लोकल होत्या. जो प्रवाशी जखमी झाला आहे त्याने आपल्याला जे घडलं ते सांगितलं असल्याचे ते म्हणाले. दोन्ही लोकल ट्रेनमधील अंतर दीड ते दोन मीटर असतं. मात्र, त्यांच्या बॅगा मागे होत्या. त्यामुळे धक्का लागला आहे, असं प्रवाशाचे म्हणणं असल्याचे ते म्हणाले. रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भात नव्या लाईनचे नियोजन केले आहे. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत.  

इतर महत्वाच्या बातम्या