संजय राऊत यांच्या बुद्धिमतेची चाचणी तिसरीत करावी लागेल. हिंदीबाबतची कार्यवाही याबाबतची कार्यवाही उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली आहे, संजय राऊत कितीही वाचवत असले तरी आता उद्धव ठाकरे पळ काढू शकत नाही, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापूरमध्ये केली. आशिष शेलार म्हणाले की, कोण काय मोर्चा काढतंय हा त्यांना अधिकार आहे. हे सर्व अनाकलनीय आहे कारण सर्व कागदपत्र जनतेच्या समोर असल्याचे ते म्हणाले. मराठीसाठी कट्टर पण विद्यार्थी हितासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे हे तिघे एकच बोलत आहेत. आजची माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी तीन भाषा शिकतात. जो विषयच नाही तो विषय काढला जात आहे.  आम्ही विद्यार्थी हिताचं काम करतोय, त्यांना मोर्चा काढून हित वाटत असेल, मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे असल्याचे शेलार यांनी सांगितले. 

आशाताई यांच्या वक्तव्याला राजकीय घेऊ नये

आशिष शेलारांशिवाय राजकारणात कोणाला ओळखत नसल्याचे आशा भोसले यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय घेऊ नये, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मी त्यांच्या आशीर्वादाने आहे, मी त्यांचा भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार साहेब जातीचा रंग लावणे हे बरे नव्हे

पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून होत असलेल्या वादावर शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण आमच्यासारख्या लोकांनी सांगणं योग्य वाटत नाही. इतिहास बघून पुणे रेल्वे स्टेशनला नाव द्यावं यात जातीभेद कुठं आला इथं?  पवार साहेब जातीचा रंग लावणे हे बरे नव्हे. शरद पवारांनी पुण्यात कोणती पगडी चालेल हा प्रश्न उपस्थित करणे याला जातीवाचक म्हणायचं का याचे उत्तर द्यावे लागेल, असे शेलार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या