Ashish Shelar : मुंबईत (Mumbai) सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) होतोय. यामध्ये अनेकांचे हाल होत आहेत. या सर्व गोष्टीला मुंबई महापालिकेचे (Mumbai Mahapalika) अधिकारी जबाबदार असल्याचे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलं. मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेले नालेसफाईचे आकडे फसवे होते असेही शेलार म्हणाले.  


25 वर्ष उबाठा सेनेचा हलगर्जीपणासुद्धा कारणीभूत


मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झालाय. या सगळ्या मुद्यावरुन आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धऱलं आहे. कंत्राटदार यांनी चोरी केली आहे. अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे असे शेलार म्हणाले. 25 वर्ष उबाठा सेनेचा हलगर्जीपणासुद्धा या सगळ्याला जबाबदार आहे असे शेलार म्हणाले. 


मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत


मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे. वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा आणि इतर रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण या परिसरात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे, तर काही ठिकाणी वाहनं वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी


आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील इतर भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल