Sunetra Pawar : खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ज्यावेळी संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती (Baramati) शहरात दाखल झाली त्यावेळी त्यांनी पालखीचे स्वागत केलं. त्याआधी वारकऱ्यांना रेनकोटचे देखील वाटप केलं, त्यानंतर समाज आरतीला खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी हा हजेरी लावली. आषाढी वारीच्या पुजेच्या मानासंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. आषाढी वारीची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले होते.
वारकरी सांप्रदायाची माझी नाळ लहानपणापासूनच जोडलेली : सुनेत्रा पवार
थोड्या वेळापूर्वी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन बारामतीमध्ये झालं आहे. बारामती मध्ये वारकऱ्यांची रेलचेल आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बारामतीतील मंडळी वारकऱ्यांची सेवा करत आहेत. मी संत गोरा कुंभाराच्या मातीत जन्मलेली आहे. वारकरी सांप्रदायाची माझी नाळ लहानपणापासूनच जोडली गेली असल्याचे मत खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. या सर्व गोष्टींचे मला वेध लागलेले असतात. बारामतीत पालखीच्या आगमनाचा सर्वत्र आनंद असतो. आषाढी वारीच्या पुजेच्या मानासंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊलीकडे मागणं मागण्याचा अधिकार आहे. माऊलीला पूर्ण करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील अशी मला आशा असल्याचे पवार म्हणाल्या.
महाराष्ट्रातील लोक कसे सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे साकडे
काही ठिकाणी पाऊस झाला आहे पण काही ठिकाणी तितका पाऊस झाला नाही. बळीराजा आणि महाराष्ट्रातील लोक कसे सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे साकडे घातल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. पवार कुटुंब एकत्र येण्याची इच्छा कधी पूर्ण होणार याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ती पांडुरंगाची इच्छा आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे.
दादा जे बोलतात ते करतात
माळेगाव कारखान्याचे सर्व सभासदांचे मनापासून अभिनंदन करते. त्यांचे आभार मानते की त्यांनी अजितदादा जे काही बोलतात आणि कृती करतात त्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी सभासदांना मतदान केलं आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. दादा जे बोलतात ते करतात. आजपर्यंत बारामतीकरांनी त्यांना तसं पाहिलं आहे.शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे आहे कामगारांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी दादा जसे बोलले आहेत तसे प्रयत्न करतील असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.