Raj Thackeray Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांपूर्वी वेगळे झालेले राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आज (5 जुलै) मराठी मुद्द्यावर एकत्र दिसणार आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक राजकीय समीकरणे पाहिली आहेत. आता सर्वांच्या नजरा येथे ठाकरे बंधू एकत्र येणे ही नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात असेल का याकडे लागल्या आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध केला होता, त्यानंतर महायुती सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय सध्यासाठी पुढे ढकलला आहे. या निमित्ताने मराठी एकतेचा विजय साजरा करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे विजय सभा आयोजित करण्यात येत आहे.

Continues below advertisement


वरळी डोमकडे मराठी माणसांची पावले पडू लागली


दरम्यान, विजयी मेळाव्यासाठी आज सकाळपासून वरळी डोमकडे मराठी माणसांची पावले पडू लागली आहेत. या मेळाव्यासाठी पालघरमधील अनेक मनसैनिकांनी शिवसैनिक रवाना झाले आहेत. पालघरमधील मनसैनिक वेगवेगळे पोस्टर तयार करून या मेळाव्याला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये तुलसी जोशी महाराष्ट्रद्रोहींना फटकार देणारी बॅनर्स सुद्धा सोबत आणल्याने लक्ष वेधून घेत होती. ते लोकलने प्रवास करून दादरला उतरताच महाराष्ट्रद्रोही बॅनरला विरोध करत पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रात चुकीला माफी नाही म्हणत राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोहीला फटकार देतानाचे पोस्टरही लक्ष वेधत होते. मात्र, या पोस्टर्ससह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गाडीत डांबले. 


रॅलीमध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा आणू नये असे आवाहन


दरम्यान, एवढेच नाही तर प्रत्येक मराठी प्रेमी, साहित्यिक, लेखक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकार यांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सभेत कोणत्याही पक्षाचा झेंडा आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


विजय सभेची रूपरेषा काय असेल?


• राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मंचावर असतील. 
• वरळी डोममध्ये सुमारे 8 हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.
• हॉलमध्ये, बाहेर आणि रस्त्यावर एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत.
• वरळी डोम तळघरात 800 वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे.
• वरळी डोमच्या समोरील कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकींसाठी पार्किंगची सुविधा आहे.
• महालक्ष्मी रेसकोर्सवर बस आणि मोठ्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे.


गेल्या 20 वर्षांत उद्धव आणि राज ठाकरे यांनी राजकीयदृष्ट्या अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तथापि, येणाऱ्या महापालिका निवडणुका दोघांसाठीही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की ही एकता मराठीसाठी नाही, तर महापालिका निवडणुकीसाठी आहे.


इतर महत्वाच्या बातम्या