Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर बदल शरद पवार गटाकडून सोशल मीडियामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आहे.






आमचा पक्ष शरद पवार आमचे चिन्ह शरद पवार अशा पद्धतीने शरद पवार गटाकडून सोशल मीडियामध्ये प्रचार जोरदारपणे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जोरदारपणे प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. इतकंच नव्हे, तर शरद पवार यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. 






या ट्विटमध्ये ते आपला निर्धार व्यक्त करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियात आमचा पक्ष, आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असे म्हणत फोटो व्हायरल करण्यात येत आहेत.  शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना आमचा पक्ष, आमचा चिन्ह फक्त शरद पवार साहेब असल्याचे म्हटलं आहे.