अकोला : अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या दोन आरोपींपैकी एक आरोपी हा भारतीय लष्करातील जवान आहे. मंगेश इंदोरे असे त्याचे नाव आहे. गावी सुट्टीवर आल्यानंतर एका मित्रासह तो हा गोरखधंदा करायचा. पोलिसांनी मंगेशला त्याच्या मित्रासह बाळापूर तालुक्यातील कोळासा गावातून अटक केली आहे.
अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मंगेश इंदोरे आणि मिलिंद डाबेराव या दोघांना चेन स्नॅचिंगच्या आरोपाखाली अटक केले आहे. हे दोघेही खास मित्र असून बाळापूर तालुक्यातील कोळासा गावचे रहिवाशी आहेत. मंगेश इंदोरे हा भारतीय लष्करात सैनिक म्हणून कार्यरत आहे. तो सध्या जम्मू काश्मिरमधील किश्तवाड येथे राष्ट्रीय रायफल्सच्या सतरा बटालियनमध्ये कार्यरत आहे. गावी सुट्टीवर आल्यानंतर तो मित्र मिलिंदसह अकोल्यात चेन स्नॅचिंग करायचा.
अकोल्यातील अनेक भागात या दोघांनी चेन स्नॅचिंग केल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय शेगावातही त्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मंगेशकडून सध्या एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मागच्या महिन्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या काकूंचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली इथे घडली होती. यासोबतच अकोल्यातील अलीकडच्या काळात घडलेल्या अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची उकल या दोघांच्या अटकेमुळे होण्याची शक्यता आहे.
चेन स्नॅचिंग करणारा लष्करातील जवान गजाआड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2018 07:59 PM (IST)
मंगेश इंदोरे हा आरोपी भारतीय लष्करातील जवान आहे. गावी सुट्टीवर आल्यानंतर एका मित्रासह तो हा गोरखधंदा करायचा. पोलिसांनी मंगेशला त्याच्या मित्रासह बाळापूर तालुक्यातील कोळासा गावातून अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -