मुंबई: मुंबईतील एका कार्यक्रमात, फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) सुरुवातीला इंग्रजीतून भाषण केले आणि नंतर उर्वरित पूर्ण भाषण मराठीतून केले. या भाषा बदलामागे नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रावर दिलेला भर हे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मराठीतून बोलल्यास त्यांचे विचार आणि आणि भूमिका थेट संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) राहुल नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक केलं. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामाचं कौतुक करत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. शिंदे ओरीजनल शिवसेना तर अजित पवार ओरीजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन बाहेर पडले अशा काळात कायद्याचं नॉलेज असलेले अध्यक्ष आवश्यक होते. त्याचबरोबर राहुल नार्वेकरांची केलेली निवड योग्य होती ती त्यांनी सिध्द करून दाखवली, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचं कौतुक केलं आहे. 

माझ्यासमोर अध्यक्ष पदासाठी एक चेहरा होता...

अध्यक्ष असतात ते नॉर्मल सभागृह चालवतात. मात्र एखाद्या वेळी त्यांना न्यायाधिशांचं काम करावं लागतं. सर्व माहिती घेऊन त्यावरती निर्णय देखील द्यावा लागतो. तीच वेळ मागील काळामध्ये होती. एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेना घेऊन बाहेर पडले होते. नंतरच्या काळात अजित पवार देखील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन बाहेर पडले. त्यावेळी माझ्यासमोर अध्यक्ष पदासाठी एक चेहरा होता ते म्हणजे राहुल नार्वेकर. मी ठामपणे सांगू शकतो की, केलेली निवड योग्य होती ती त्यांनी सिध्द करून दाखवली, असंही पूढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

राहुल नार्वेकर यांची निवड योग्य होती 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या प्रकरणी नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचा त्यांनी दाखला दिला. शिंदे हे 'ओरिजिनल शिवसेना' घेऊन बाहेर पडले, तर अजित पवार हे 'ओरिजिनल राष्ट्रवादी' घेऊन बाहेर पडले, अशा काळात कायद्याचे सखोल ज्ञान असणारे विधानसभा अध्यक्ष आवश्यक होते, असे फडणवीस म्हणाले. राहुल नार्वेकर यांची निवड योग्य होती हे त्यांनी आपल्या निर्णयांतून सिद्ध केले, असे फडणवीसांनी नमूद केले. सभागृह चालवण्याबरोबरच, अध्यक्षांना न्यायाधीशाचे काम करावे लागते आणि सुनावणी घेऊन निकालही द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाकडून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असताना, अशा अनेक खटल्यांमध्ये नार्वेकरांची निवड योग्य होती, असे फडणवीसांनी म्हटले. मी त्यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून केलेली निवड अगदी बरोबर होती (I was absolutely right in choosing him as Speaker) असे त्यांनी म्हटलं आहे.