Anil Parab :मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरात समुद्रात भराव टाकून 350 एकर जमीन तयार करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेत दिली. पर्यावरणाच्या नियमांना बगल देण्यात आली आहे. सध्या मार्केट व्हॅल्यू पाहिली तर 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य त्या जमिनीचे असेल असे परब म्हणाले. एखादा बिल्डर एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या समुद्रात भराव टाकून जमीन तयार करतो. त्यावर गुन्हा दाखल होतं नाही हे दुर्दैवी असल्याचे अनिल परब म्हणाले.
दरम्यान, या व्यक्तीला 67 कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. मात्र 1 रुपया देखील त्याने भरलेला नाही. कोणत्या अधिकाऱ्याच्या संगनमताने हे करण्यात आलं आहे, त्यावर कारवाई करा असेही अनिल परब म्हणाले. संजय शिरसाठ प्रकरणात ज्या अधिकाऱ्याने सिद्धांत शिरसाठ याची कंपनी नोंदणीकृत नसताना देखील त्याला टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली, त्यावर तत्काळ कारवाई करा अशी मागणी देखील अनिल परब यांनी केली. सरकारकडून नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आम्हाला अपेक्षा आहे की याबाबक कारवाई केली जाईल असेही अनिल परब यावेळी म्हणाले.
अंबादास दानवेही विधानपरिषदेत आक्रमक, मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर केले आरोप
अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे शिरसाट यांची कंपनी संबंधित काळात नोंदणीकृत नव्हती, तरीही त्यांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. अशा अवस्थेत ज्याच्यामुळे ते पात्र ठरले, त्या संबंधित अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच, या प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सभागृहात "सभापती न्याय द्या!" अशा जोरदार घोषणा दिल्या, तर काही सदस्यांनी थेट शिरसाट यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. विधान परिषदेच्या सभागृहात आज व्हिट्स हॉटेल टेंडर प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा गंभीर आरोप केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
