Parinay Phuke on Anil Deshmukh : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे खरे मर्द असतील तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढवावी, असं चॅलेंज भाजपचे आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके (Parinay Phuke) यांनी दिलं आहे. अनिल देशमुख यांची औकात नाही. त्यांचा मुलगा त्यांना काटोलमधून निवडणूक लढू देणार नाही, रिकामं राहण्यापेक्षा त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढून दाखवावी असे फुके म्हगणाले.
अनिल देशमुख तुम्ही खरे मर्द असाल तर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढून दाखवावी असं चॅलेंज परिणय फुके यांनी दिलं आहे. आता या चॅलेंजवर अनिल देशमुख नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे 1,09,237 मते मिळवून विजयी झाले होते. तर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे डॉ. आशिष देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 49,344 मते होते. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे.
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु, राजकीय नेत्यांनी प्रचाराला केली सुरुवात
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. अशातच महाविकास आघाडी आमि आणि माहायुती या दोन्हीकडूल बाजूंमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अद्याप जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळं कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिलणार हे अद्याप फ्किस झालेलं नाही. त्यामुळं सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच अनेक नेत्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असा दावा सत्ताधारी करत आहेत. तर महायुतीचा पराभव करुन आम्ही सत्तेत येऊ असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळं 23 नोव्हेंबरलाच खरं राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: