सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत (Angar) नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर (Solapur) सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत. न्यायाधीशानी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. यानंतर उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असे मत उज्वला थिटे यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही उच्च न्यायालयात जाणार
सोलापूर (Solapur) सत्र न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. या निर्णायविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ अशी भूमिका उज्वला थिटे यांनी मांडली आहे. जर तिथूनही न्याय मिळाला नाही तर परमेश्वराचे दार तर आहेच. पण पुढच्या निवडणुकीत उज्वला थिटे पूर्ण पॅनल उभं करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर निकाल आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ की याबाबतीत उच्च न्यायालयाय जायचं की नाही असेही थिटे म्हणाल्या. अंतिम आदेश हा जिल्हा न्यायालयाचा असतो. रिट करण्याचा हक्क असतो त्यावर उद्या निर्णय घेऊ असेही त्या म्हणाल्या.
उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डर कोर्टाने सांगितली आहे. आमचे अपील अर्ज फेटाळण्यात आलं आहे. कोर्टाने काय ग्राउंडवर हा निर्णय दिलं हे उद्या आम्हला सविस्तर ऑर्डर आल्यावर समजेल. आम्ही न्यायालयाच्या निर्णयचा आदर करतो असे मत उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी व्यक्त केले.
न्यायालयीन स्तरावर आम्ही हरलो पण जनतेच्या लढाईत आम्ही जिंकलो : उमेश पाटील
सुरुवातीला मी उज्वला थिटे यांच्या अभिनंदन करतो की त्यांनी मोठी लढाई लढली आहे. कोर्टाचा उद्या सविस्तर निकाल आल्यानंतर आम्हाला समजेल की का न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. उज्वला थिटे यांना एक चेकलिस्ट देण्यात अली होती, कदाचित कोर्टाने ती ग्राह्य धरली असेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक गोष्टीचे पुरावे तयार करून ठेवण्यात आले होते. प्रत्येक टप्यावर बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून सगळं करण्याय आलं आहे. लढाई न्यायालयीन स्तरावर आम्ही हरलो पण जनतेच्या लढाईत आम्ही जिंकलो असल्याचे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या: