नवसाला पावणारी देवी असल्याने सामान्यांबरोबर राजकीय व्यक्तीचीही इथे रेलचेल असते. आता 2019 ची लोक सभेची निवडणूक ही जवळ आल्याने देवीकडे मागणे मागण्यांसाठी विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते इथं गर्दी करत आहेत. आजचं राज ठाकरे, नारायण राणे, आशिष शेलार यांनी यात्रेला भेट दिली. मंदिर परिसरात राजकीय पक्ष्याचा होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात.
VIDEO | कोकणात आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेला सुरुवात | सिंधुदुर्ग | एबीपी माझा
सध्या मंदिरात भजन आणि मंत्रोचाराने मंदिर परिसर अधिकच भक्तिमय झालाय. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी म्हणून भराडीदेवीची ख्याती आहे. या यात्रेचं विशेष म्हणजे भराडीदेवीच्या यात्रेची तारीख कोणत्याही कॅलेंडर किंवा पंचांगात सापडत नाही. देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते.
आंगणेवाडीची यात्रा हे काय निवडणुकीचा आखाडा, नारायण राणे यांचा भाजपला टोला
‘आंगणेवाडीची यात्रा हे काय निवडणुकीचा आखाडा नाही, यात्रेत येऊन कसली भाषणे करता, हिंम्मत असेल तर जाहीर सभा घेऊन दाखवा, सभेला 50 माणसे ही येणार नाहीत’ असा टोला खासदार नारायण राणे यांनी भाजपला लगावला आहे. मंदिराचं पावित्र्य राख, धार्मिक स्थळांचे भान ठेवा असा सल्लाही यानिमित्ताने भाजपला दिला.
फोटो गॅलरी
आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट