Amruta Fadnavis :  राज्यातील 29 महानगरपालिकांची रणधुमाळी संपलेली आहे. यामध्ये भाजपला मोठं यळ मिळालं आहे. अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपने यश मिळवले आहे. मात्र, शिवसेनेच्या साथीशिवाय भाजपचा महापौर बसणे शक्य नाही. त्यामुळं मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच मुंबईच्या महापैर पदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. 

मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार  

मुंबईचा महापौर भाजपा होणार की शिंदेच्या शिवसेनेचा होणार असी जोरदार चर्चा राजकी वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर महापौर मराठी होणार की अमराठी यावरुन देखील चर्चा सुरु आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसचे यावेळी त्यांनी विविध विषयावंर भाष्य देखील केलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते बिझनेससाठी गुंतवणुकीसाठी दावोसला गेले आहेत. महाराष्ट्राला एक प्लटफॉर्म मिळत आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. ही तीन दिवसाची पिकनिक होत नाही. पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाहीत असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतील भरघोस य़स मिळालं आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारं संख्याबळ या युतीला मिळालं आहे. 

सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला काढण्यात येणार

सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 --------------एकूण- 227

महत्वाच्या बातम्या:

अमृता फडणवीसांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीला चपराक, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला