अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन चिठ्ठ्या सापडल्या!
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2018 05:34 PM (IST)
38 वर्षीय अनिल दांडगे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. मुलांच्या वसतिगृहामागे असलेल्या परिसरात झाडाला दोरीच्या मदतीने गळफास लावून अनिल दांडगे यांनी आत्महत्या केली.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल दांडगे असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. 38 वर्षीय अनिल दांडगे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. मुलांच्या वसतिगृहामागे असलेल्या परिसरात झाडाला दोरीच्या मदतीने गळफास लावून अनिल दांडगे यांनी आत्महत्या केली. अनिल दांडगे हे वडाळी येथील रहिवासी होते. ते विद्यापीठात अभियांत्रिकी विभागात कार्यरत होता. आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. यामध्ये त्याने आपल्या मृत्यूनंतर पत्नीला सेवेत सामावून घेण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे. अनिल दांडगे यांच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहे.