Amravati News : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नुकत्याच विषबाधा झाल्याचे प्रकरण ताज असतानाच, आता मेळघाटातीलच चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेने मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार पुढे आलाय. सात ते आठ दिवसांपूर्वी डोमा(Doma Village) येथील आदिवासी आश्रम शाळेतील 15-16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या, काहींना घुंगरूचे आवाज यायला लागले, ही बाब वस्तीगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येतात त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली. मात्र दुसऱ्या दिवशी ही वार्ता गावात पसरताच मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली. परिणामी जवळपास 600च्या वर मुली वस्तीगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्याचाधक्कादायकप्रकारसमोरआलाआहे. (Amravati Doma Village News)

Continues below advertisement

दरम्यान, याप्रकरणाचीदखलघेत आरोग्य विभागाचे पथक देखील दाखल झाले असून त्यांनी ही भूतबाधा नसून हिस्टरीया हा मानसिक आजाराचा प्रकार असल्याचा सांगितलं. सर्व विद्यार्थिनीशी आणि पालकांशी त्यांचं कौन्सिलिंग सुरू असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितलेला आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Andhashraddha Nirmulan Samiti) नंदिनी जाधव, डॉक्टर देशमुख देखील मुंबईवरून या ठिकाणी येऊन मुलींचा कौन्सिलिंग करत असल्याचीमाहितीआहे. मुलींना त्यांचं समुपदेशन करून शाळेत परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे माहिती मुख्याध्यापक चौधरी यांनी दिली.

Andhashraddha Nirmulan Samiti: मेळघाटातील डोमा गावात भुतांची अफवाच : अंधश्रद्धा निर्मूलन

Continues below advertisement

अमरावतीच्या डोमा गावातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा पसरल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी पलायन केलं, त्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मेळघाटात गेल्या तीन दिवसापासून तळ ठोकून आहेत. अनिसच्या वतीने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचं समुपदेशन केलं जात आहे. भूत वगैरे असं काही नसतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तळ ठोकून आहेत. भुताची संपूर्ण या ठिकाणी अफवा आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचं समुपदेशन करत आहे. आम्ही पाचडोंगरी डोमा, खडीमल, यास अन्य गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेवटी विद्यार्थ्यांच शिक्षण महत्वाच आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांनी कुठलेही मनात शंका न बाळगता पुन्हा आपल्या शाळेमध्ये जाव, असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ सदस्या नंदिनी जाधव यांनी केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या