Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्यानं चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रिव्हर्समध्ये बाजूच्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रिव्हर्स मध्ये बाजूच्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळले
धारणी पो स्टे हद्दीत धारणी पो स्टे पासून 35 किलो मीटर अंतरावर राणीगांव कडे जाताना शिवाझरी ते राणीगांव दरम्यान बोलेरो पिकअप वाहणाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रिव्हर्स मध्ये बाजूच्या 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळले. वाहनात कंजोली आणि राणीगांव येथील 15 ते 20 लोक होते. यापैकी घटनास्थळावरच 4 जणांचा (एक स्त्री व 3 पुरुष ) मृत्यू झाला असून 7 ते 8 व्यक्ती जखमी आहेत. सर्व मृतक कंजोली ता. धारणी येथील आहेत. हे लोक बाजाराकरिता देडतलाई मध्यप्रदेश येथे गेले होते. सर्व मृतदेह आणि जखमी उपचाराकरिता धारणी येथे रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. वाहनचालक फरार झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Amravati Accident News : मोठी बातमी : रेल्वे क्रॉसिंगसमोर रिक्षा आणि इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, वरुड हादरलं!