Uttarakhand Assembly Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येतील तसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP)  आज   उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी  59 जणांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना  खटीमा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर मदन कौशिक हरिद्वार मतदारसंघातून, पुरोला येथून दुर्गेस्वर लाल आणि यमुनौत्री येथून केदार सिंह रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


गंगौत्रीतून सुरेश चौहान, बद्रिनाथमधून महेंद्र भट्ट, थरालीतून गोपाल राम, कर्णप्रयाग येथून अनिल नौटियाल, रुद्रप्रयाग येथून भरत सिंह चौधर, घनसाली येथून शक्ती लाल, देवप्रयागमधून विनोद खण्डारी, सुबोध उनियाल यांना नरेंद्रनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रतापनगरमधून विजय सिंह पवार, धनौल्टीमधून प्रितम सिंह आणि चकराता येथून राम शरण यांना तिकिट देण्यात आले आहे. 


 




याशिवाय डीडीहाट येथून बिशन सिंह चुफाल, द्वारहाटमधून अनिल शाही, सल्टमधून महेश जीना, सोमेश्वर येथून रेखा आर्य, अल्मोडामधून कैलाश शर्मा  निवडणूक लढवणार आहे. तर लोहाघाट येथून पूरन सिंह फर्त्याल, भीमतालमधून राम सिंह कैरा, नैनीताल येथून सरिता आर्य, कालाढूंगीतून बंशीधर भगत, रामनगर येथून दीवान सिंह, गदपूर येथून अरविंद पांडे आणि किच्छा येथून राजेश शुक्ला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha