फक्त मासे-मटण खाण्यासाठी कोकणात येतो, तो आला कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे, राणेंचा ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिले आहेत.

Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिले आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेने कोकणाला काय दिले? असा सवाल राणेंनी केला. केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतो. त्यामुळेच तो आला की हॉटेलमध्ये कोंबडी, वडे, मासे बंद ठेवायचे असे मी हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचे नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गमध्ये पआज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
चिपी विमानतळ बंद होणार नाही
चिपी विमानतळावरुन आता इंडिगो विमान पण येणार आहे. आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या 60 फूट उंच पुतळ्याचे 1 मे रोजी अनावरण होईल अशा प्रकारे नियोजन करुन काम सुरू झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 60 टक्के काम झाल्याची माहिती मिळाल्याचे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोकणाला काहीही दिले नाही
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिले नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पाहा असेही नारायण राणे म्हणाले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती पैसे दिले? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही असे नारायण राणे म्हणाले. ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी कोंबडी मासे आणि वडे बंद ठेवा असा आदेश नारायण राणे यांनी हॉटेल व्यवसायिकांना दिला आहे. चिपी विमानतळ कधीही बंद पडणार नाही. देशातील सगळ्या ठिकाणी विमाने आता जाणार असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगतिले. पण लोकांनी विविध ठिकाणी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत म्हणजे उत्पन्न वाढेल असा सल्ला देखील नारायण राणे यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ






















