एक्स्प्लोर

MHADA Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या २,२६४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ, २४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

MHADA Kokan Mandal Lottery : कोकण मंडळाच्या २,२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज करण्यास अर्जदारांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे २,२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.         
          
कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार २४ डिसेंबर, २०२४  रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. 26 डिसेंबर, २०२४ रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक २६ डिसेंबर, २०२४ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFTद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. 

सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी ०८ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दिनांक १० जानेवारी, २०२५  रोजी सायंकाळी ५ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.  १६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोडतीत सहभाग घेणार्‍या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 
           
२१ जानेवारी, २०२५  रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे.  
         
या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ८२५ सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या ७२८ सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे ११७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.    
         
श्रीमती रेवती गायकर यांनी सांगितले की, राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे सोडतीविषयक प्रसार मोहीम राबविता आली नाही. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर योजनेतील सदनिकांच्या विक्रीला प्रतिसाद वाढावा यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंडळाने ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॉल्सला आतापर्यंत सुमारे ६००० लोकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी ३०१ जणांनी सदनिका खरेदीसाठी विक्री किंमतही जमा केली असल्याचे श्रीमती गायकर यांनी सांगितले. २२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज करण्यास अर्जदारांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती गायकर यांनी केले आहे.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजलेUday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूकDilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget