Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपने (BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामठीतून प्रदेश भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार, भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर कुलाब्यातून तर शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 


घराणेशाहीचा आरोप, पण घराणेशाहीमध्येच तिकिटांचे वाटप 


घराणेशाहीवरून सातत्याने आरोप होत असतानाच भाजपने पहिल्या यादीत घराणेशाहीमध्येच तिकिट नेत्यांच्या लेकराबाळांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यास संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण  यांच्या मुलीला, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा, माजी मंत्री बबनराव पाचपूते यांची पत्नी प्रतिभा सातपूते, राज्यपाल हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे अशी घराणेशाहीमध्येच तिकिट दिली गेली आहेत. भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना महत्त्व दिले आहे. जुन्या आणि अनुभवी नेत्यांवर पक्षाची भिस्त असल्याचे भाजपच्या पहिल्या यादीतून स्पष्ट झाले आहे. 


भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी  


दरम्यान, चिखली मतदारसंघातून श्वेता विधाधर महाले, भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, फुलंबारीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण, नाशिक पश्चिममधून सीमाताई महेश हिरे, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूरमधून मंदा विजय महात्रे, मनिषा चौधरी, मनिषा पवार, नाशिक पश्चिममधून सीमाताई महेश हिरे. गोरेगाव येथील विधा जयप्रकाश ठाकूर, पर्वती येथील माधुरी सतीश मिसाळ, शेवगाव येथील मोनिका राजीव राजळे, श्रीगोंदा येथील प्रतिभा पाचपुते व केज येथील नमिता मुंद्रा यांची नावे आहेत. 


किती मुस्लिम, एससी आणि एसटीला संधी?


भाजपच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेले नाही. मात्र, अनुसूचित जातीच्या चार आणि अनुसूचित जमातीच्या सहा उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.


कोणत्या उमेदवारांना पहिल्यांदा संधी?



  1. प्रतिभा पाचपुते - श्रीगोंदा 

  2. विनोद शेलार - मालाड पश्चिम 

  3. राजेश बकाने - देवळी (गेल्यावेळी अपक्ष) 

  4. श्रीजया चव्हाण - भोकर 

  5. शंकर जगताप - चिंचवड 

  6. विनोद अग्रवाल ( गेल्यावेळी अपक्ष) - गोंदिया 

  7. अनुराधा चव्हाण - फुलंबरी

  8. सुलभा गायकवाड (आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी) - कल्याण पूर्व 

  9. राहुल आवाडे - इचलकरंजी 

  10. अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र)- रावेर

  11. महेश बालदी - उरण 


इतर महत्वाच्या बातम्या