Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) वातावरण भक्तिमय झाले असून आषाढी एकादशीला पंढरपूरला (Pandharpur) जाण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. अशातच प्रवाशांची सोय व्हावी म्हणून 24 जून पासून मध्य रेल्वेने 76 तर दक्षिण मध्य रेल्वेने सहा पंढरपूर आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून यातील 18 गाड्या मनमाडमार्गे (Manmad) धावणार आहेत. 


आषाढी एकादशीसाठी भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असून राज्यभरातून पालख्या (Payi dindi Palkhi) पंढरपूरला रवाना झाली आहेत. आता राज्यातील इतर भाविकांसाठी रेल्वेकडून (Central railway) पंढपूरला जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यातील या गाड्या सोडण्यात येणार आहे. ज्या नाशिकनजीक मनमाडमार्गे धावणार आहे. या गाड्यांत  नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी तर नांदेड-आदिलाबाद, छत्रपती संभाजी नगर, कुर्डूवाडी अशा एकूण 82 गाड्या धावतील. त्यातील काही भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड मार्गे धावणार आहेत तर भुसावळ-पंढरपूर अशा दोन विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


नागपूरहून जाणाऱ्या भाविकांसाठी 


नागपूर-मिरज (Nagpur) गाडी 25 व 26 जूनला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूरहून सुटेल तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजून 55 मिनिटांनी मिरजला पोहोचेल.  तर मिरज येथून 26 व 29 जूनला पहाटे बारा वाजून 55 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी बारा वाजून 25 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. 20 डब्यांच्या या गाडीसाठी अजनी, वर्धा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, दौंड, पंढरपूर असे थांबे राहतील. नागपूर-पंढरपूर रेल्वे 26 व 29 जूनला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर 27 व 30 जूनला पंढरपूरहुन सायंकाळी पाच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी बारा वाजून 25 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. 


अमरावती, लातूर, मिरजहून जाणाऱ्या भाविकांसाठी 


नवीन अमरावती पंढरपूर गाडी 25 व 28 जूनला दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी नवीन अमरावतीहुन सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. तर पंढरपूर येथून 26 व 29 जूनला सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी बारा वाजून 40 मिनिटांनी नवीन अमरावतीला पोहोचेल. पंढरपूर गाडी 26 व 29 जूनला सकाळी साडेअकरा वाजता खामगावहून सुटून दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर पंढरपूर येथून 27 व 30 जूनला पहाटे पाच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता खामगावला पोहोचेल. या व्यतिरिक्त लातूर पंढरपूर साठी आठ गाड्या मिरज पंढरपूरसाठी 30 गाड्या, मिरज कुर्डूवाडीसाठी वीस गाड्या सोडल्या जातील. 


दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या


दरम्यान या 76 सेवा व्यतिरिक्त दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांत जालना-पंढरपूर ट्रेन 27 जूनला सायंकाळी साडेसात वाजता जालन्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पंढरपूरला पोहोचेल. पंढरपूर-नांदेड गाडी पंढरपूरहुन 28 जूनला सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल. तर त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेपर्यंत नांदेडला पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर-पंढरपूरहुन 28 जून रोजी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरवरून सुटेल तर दुसऱ्या दिवशी साडेअकरा वाजता पंढरपूरला पोहोचेल. 29 जूनला पंढरपूरहून रात्री साडेअकरा वाजता सुटेल तर छत्रपती संभाजी नगरला दुसऱ्या दिवशी एक वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.आदीलाबाद पंढरपूर ही गाडी 28 जूनला सकाळी 11 वाजता आदीलाबाद येथून सुटून दुसऱ्या दिवशी नऊ वाजून वीस मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. पंढरपूरहुन 29 जूनला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर आदिलाबादला दुसऱ्या दिवशी आठ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.


भुसावळ पंढरपूरसाठी विशेष गाडी 28 जून रोजी


उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने जळगाव धुळे नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर विशेष गाडी 28 जूनला भुसावळहुन दुपारी दीड वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर पंढरपूरहुन रात्री साडेदहा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता भुसावळला पोहोचेल. या सर्वात मोठ्या 24 डब्यांच्या गाडीसाठी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी हे थांबे राहतील.