(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Mumbai Rain Live : खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या राज्यात तैनात
Maharashtra Mumbai Rain Live : मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rain Live : जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
कोकणात मुसळधार
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली आहे.
कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या उघडीपी नंतर संध्याकाळ पासून दमदार पावसाची हजेरी
नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या उघडीपी नंतर संध्याकाळ पासून दमदार पावसाची हजेरी.
एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यात चांगल्या पावसाची सुरुवात.
अँकर:पावसाळा सुरू होऊन जुलै महिना उजाडला तरी जिल्ह्यात पावसाने आपले खाते उघडले नव्हते. तर जून महिना संपूर्ण कोरडा गेल्या त्यानंतर आता जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज संध्याकाळी काळ्याकुट्ट ढगांनी वर्दळ करत जोरदार पावसाला सुरुवात केलीय.नांदेड शहरात अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वाहतुकीचीही त्रेधातिरपीट होऊन नागरिकांची तारांबळ उडालीय.तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर,भोकर,उमरी,हिमायतनगर, माहूर,किनवट, हदगाव,बिलोली, देगलूर तालुक्यात पाऊस धुवांधार पाऊस बरसतोय.त्यामुळे शेतकऱ्यांची दुबार पेरणी टळून पिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान पावसा अभावी खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तर गेल्या पाच महिन्या पासून उकड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळालाय.
Rain Update : पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद
Rain Update : पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद
Rain Update पुढील पंधरा दिवस परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद..
पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
पालघर जिल्ह्यात 7 ते 10 जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभाग मुंबई दवारे देण्यात आला आहे. मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची नोंद झाली आहे आणि पुढील पाचही दिवस पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.