Maharashtra Live: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्ट जारी, सहा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.
LIVE

Background
Raigad Rain: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 15 जुलै 2025 रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर आले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड दिवसभरातील पावसाचा आढावा
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 98.01 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा, नागोठणे, पाली,म्हसळा,महाड मधील भागाला बसला. काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल होत तर मुंबई गोवा महामार्गासहित इतर राज्य मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली होती. सहा तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती.जिल्ह्यातील प्रामुख्याने पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सुध्दा धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे आता जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही तासात पुन्हा हा जोर वाढला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यात खासगी बस-दुचाकीचा अपघात, तिघांचा मृत्यू
Anc - पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावर घोडेगाव शहरानजीक खासगी प्रवासी बस व मोटारसायक मध्ये झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे.
Vo - उत्तर प्रदेश पासिंगची खासगी प्रवासी बस ही भीमाशंकर च्या दिशेने जात होती तर मोटारसायकल घोडेगाव वरून मंचरच्या दिशेने जात असताना घोडेगाव शहरानजीक असणाऱ्या पळसटीका फाट्यावर बस व मोटार सायकल ची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बसने मोटर सायकलला काही अंतर फरफटत नेले असून मोटार सायकल चा अक्षरशा चेंदामेंदा झालाय. या भीषण अपघातात मोटार सायकल वरून प्रवास करणारे आंबेगाव तालुक्याच्या कोळवाडी गावातील अथर्व खमसे, गणेश असवले, भारत वाजे या तीन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झालाय.























