पादरीचा सैराट करेल त्याला.. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जालन्यात ख्रिश्चन समाज आक्रमक, मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला, नेमका वाद काय?
जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढून असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला.

Jalna: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज जालन्यात उमटत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे. जालना शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला असून या मोर्चाला दलित संघटनांनी ही पाठिंबा दिलाय. जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढून असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला.
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
सांगलीमध्ये ऋतुजा नावाच्या महिलेला धर्मांतर कर म्हणून तिच्यावर दबाव आणला. तिच्या पोटात सात महिन्यांचा बाळ होतं. यात घरात एखादा मोबाईल जरी फुटला तरी ख्रिश्चन पादरी तिच्या नवऱ्याला व सासू-सासर्यांना ती हिंदू रितीरिवाज पाळते. ही सैतान आहे. त्यामुळे तुमच्या घरात नुकसान होत आहे. ती गर्भवती होती तेव्हा तिच्यावर गर्भसंस्कार हिंदू पद्धतीने नाही तर ख्रिश्चन पद्धतीने करण्यासाठी सासरच्यांनी दबाव निर्माण केला. यातूनच तिने आत्महत्या केली. मी जबरदस्ती करणे योग्य आहे का? या ख्रिश्चन पादरीवर गुन्हा नाही दाखल करायचा का? तुम्ही गावोगावी जाता. फसवता. अमिष दाखवता तुम्ही लोकांचा धर्मांतरण करता. हे योग्य नाही. ऋतुजा या महिलेचा तुम्ही अशा पद्धतीने खून केला आहे. त्यावर आम्ही भूमिका घ्यायची नाही का? ' असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला .
ते पुढे म्हणाले, 'आम्ही हिंदू धर्मातील लोक तुम्हा कोणाला धर्म बदला म्हणून फसवणूक करतो का? आम्हीच दाखवतो का? त्यामुळे तुम्ही गावागावात जाऊन जे उद्योग करता येते बंद करा. गाव खेड्यातल्या लोकांना बळी पाडून, आमिष दाखवून त्यांना धर्मांतरण करायला लावताय .हे कसं चालेल . आम्ही धर्माचं रक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये गावातील सगळ्यांनी राहिला हवं .आम्ही कोणाला धर्मांतरण करण्यासाठी जात नाही .दबाव टाकत नाही . जबरदस्ती करत नाही . त्यामुळे कुणीही गाव खेड्यात असे उद्योग करायला येऊ नये .जर अशा पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी कोणी गावात आला तर त्याला योग्य प्रकारे उत्तर द्या ही आमची आज उद्या आणि कायम हीच भूमिका आहे . ' असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले .
वादग्रस्त वक्तव्य काय होतं ?
आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जातात त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवले पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. सांगलीतील यशवंत नगर येथे धर्मासाठी तगादा लावलेल्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.






















