Harshal Patil Case: जबाबदारी झटकत गुलाबराव पाटलांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं; हर्षल पाटील कुटुबीयांचा संताप
Harshal Patil Case: हर्षल पाटील आमच्या यादीवरील कॉन्ट्रॅक्टदार नसल्याचे सांगत जबाबदारी झटकन चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया हर्षल पाटील यांचे चुलत भाऊ आणि हर्षल पाटील यांचे गावातील कंत्राटदारांनी दिली.

Harshal Patil Case: मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे, हर्षल पाटील यांचे कुटुंब आधीच धक्क्यामध्ये असताना गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचा संताप हर्षल पाटील यांचे चुलत भाऊ आणि हर्षल पाटील यांच्या गावातील कंत्राटदारांनी व्यक्त केला.
कॉन्ट्रॅक्टदार नसल्याचे सांगत जबाबदारी झटकन चुकीचं
सर्वच ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टदारांच्या माध्यमातून काम केलं जातं. मात्र, हे सरकार आता जबाबदारी झटकण्याचे काम करत आहे. कोट्यावधी रुपयांचे काम घेत असताना लायसनची लिमिटही महत्त्वाचे असते. सांगली जिल्ह्यामध्ये केवळ चार ते पाच कॉन्ट्रॅक्टदार यांचे लिमिट कोट्यावधी रुपयांचे आहेत. त्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टदाराच्या माध्यमातून काम केली जातात. मात्र हर्षल पाटील हे आमच्या यादीवरील कॉन्ट्रॅक्टदार नसल्याचे सांगत जबाबदारी झटकन चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया हर्षल पाटील यांचे चुलत भाऊ आणि हर्षल पाटील यांचे गावातील कंत्राटदार यांनी दिली.
हिंदुत्वाचा मक्ता घेतलेलं सरकार समजता आणि हिंदूच मरत आहे
ते पुढे म्हणाले की, या घटनेला 100 टक्के राज्य सरकार जबाबदार असून हिंदुत्वाचा मक्ता घेतलेलं सरकार समजता आणि हिंदूच मरत आहे. कंत्राटदारांची 90 हजार कोटीचं देणं असताना आणि शक्तिपीठ काढा, अशी हताश प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात पहिला बळी हर्षलचा गेला. कंत्राटदारांची लाख कोटीचं बिल थकित आहे. सुशिक्षित बेरोजगाकर नोकरी नाही म्हणून इकडं आले आणि त्यांना हात पसरून बसायची पाळी आली आहे. एका बाजूने कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांचा तगादा आणि दुसऱ्या बाजूने पैसे नसल्याने तगादा असल्याने अनेक कंत्राटदार तणावात आहेत. निवडणुकीसाठी योजना आणून लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि आता कुंकू पुसण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले. या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून हर्षलने पदरचे पैसे घातले, रान विकलं, सोनं विकलं, लोकांचे पैसे घेतल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात राज्य सरकारवर गुन्हा दाखल करावा, त्याच्या पत्नीला पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या























