Ajit Pawar Oath: अजितदादांच्या शपथविधीला प्रफुल्ल पटेल उपस्थित! हे सर्व पवारांच्या संमतीने की पवारच चितपट? राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
Praful Patel : शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित होते.

NCP Political Crisis : राज्यात पहाटेच्या शपथविधीचे कवित्व अजूनही संपलं नसताना आता तो दुपारच्या शपथविधीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यात भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांना यश आलं आहे. अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 37 आमदारांचा आणि शरद पवारांच्या जवळच्या लोकांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण आजच्या शपथविधीला शरद पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते अजित पवारांच्या सोबत दिसत होते. त्यामध्ये शरद पवारांच्या जवळचे समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफांचा समावेश आहे. अजित पवारांना सध्याच्या घडीला 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे अजित पवार यांचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू होती. प्रफुल्ल पटेल हे त्यावेळी त्यांच्यासोबत असतील असं सांगितलं जात होतं असं समजलं जात होतं. पण अजितदादांच्या शपथविधीला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते आणि हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता.
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या सोबत उपस्थित असल्याने शरद पवारांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचा संदेश दिला जात आहे अशीही चर्चा होती.
अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा
अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा निर्णय वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या या निर्णायाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का ? असा सवालही यामुळे उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या बंडावर अद्याप शरद पवारांची कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला आहे.
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती.तरुणांना संधी देणं गरजेचं. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे, असे अजित पवार म्हणाले. .
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहेत. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहोत. नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेल्गेला आहे. काही जण आरोप करतील, साडे तीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआनं काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
