Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर विश्वास टाकण्यात आला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विधानपरिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र सिद्दीकी यांनी उमेदवारी मिळाली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

पक्षाने उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली. भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यात जो साथ देईल त्याच्यासोबत असेल असं म्हणत अमोल मिटकरींनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.

उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नसल्याची खंत 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे. आपल्याला उमेदवारी नाकारताना पक्षाने साधं विचारण्याचंही सौजन्य दाखवलं नसल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याने हे फळ मिळालं त्याचा प्रश्न त्यांनी केला आहे. दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अजित पवारांचे अपघाती मृत्यू संदर्भात जे सोबत असतील त्यांच्यासोबत जाऊ, असं म्हणून त्यांनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत. 

Continues below advertisement

Who is Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजय मिळवून करून त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला होता; त्याकाळी ते राज्यातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. विधिमंडळातील कामगिरीसोबतच त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती.