Amol Khune : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली सुपारी दिल्याचा आरोप मराठा आंदोलक अमोल खुणे (Amol Khune) यांच्यावर केला होता, यानंतर अमोल खुणे यांनी अनेक वेळा मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलंय. अशातच आज पुन्हा एकदा अमोल खुणे यांनी मनोज जरांगे यांना थेट रायगडावरील टकमक टोकाचासंदर्भदेतथेट आव्हान दिलंय. आपण मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी घेतली असेल तर आपला टकमक टकावून कडेलोट करावा, मात्र आपण यात निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करावा, असे आव्हान अमोल खुणे यांनी केलंय.
दरम्यान, मला शिक्षा लागण्यासाठी माझ्या विरोधात ज्या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते त्या आमदार, खासदारांनी जरांगेच्या विरोधात नार्को टेस्ट आणि आयआयटीची मागणी करावी, असे देखील अमोल खुणे यांनी म्हटलंय.
Manoj Jarange Patil vs Amol Khune: जरांगे पाटलाच्या आरोपांना उत्तर
मनोज जरांगे जे आरोप करतात त्या आरोपात किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात कळेल. जरांगे पाटलांनी बोलताना तोंड सांभाळून बोलावं. मला ते बोलले सुपार्या घेऊन हे करतो, ते करतो, तुझी पैदास 96 कुळी आहे का? मला तुमचं काढायला लावू नका, माझी काय पैदास काय हे मला माहिती आहे. मी तुमच्यापर्यंत खोलवर जर गेलो तर तुम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मला तुमच्यासारखा जातिवाद भडकवायचा नाही. मी सत्याच्या बाजूने चालत आहे. तुम्हाला काम करायचे तर समाजासाठीच काम करा. जाती-जातीत भांडण लावण्याचे काम बंद करा. उगाच मराठ्यांच्या पोराची माथे भडकवू नका, असेही अमोल खुणे यांनी म्हटलंय.
काय आहे कोपर्डी प्रकरण?
- 13 जुलै 2016 रोजी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
- नोव्हेंबर 2017 मध्ये जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष मवाळ यांना दोषी ठरवण्यात आले.
- जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा आणि उर्वरित दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जितेंद्र शिंदेकडून मुंबई हायकोर्टात अपील करण्यात आलं.
- जितेंद्र शिंदेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरुच आहे.
- सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांनी उपोषण केले होते.
- 10 सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही बातमी वाचा:
