मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महाराष्ट्रातील पहिली सभा ही गुरुवारी, 7 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात होणार आहे. त्या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील निवडणुकीसाठी उभे आहेत. त्याच दिवशी त्यांच्या सांगली, सातारा आणि पुण्यामध्येही सभा होणार आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या सभेचेही वेळापत्रक समोर आलं आहे.  


महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात होणार आहे. 


भाजपकडून अमित शाहांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये गुरूवारी, 8 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दक्षिणमध्ये पहिली सभा होणार आहे. या ठिकाणी भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे पुतणे आणि आमदार ऋतुराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 


अमित शाहांच्या सभांचे नियोजन ( गुरूवार, 8 नोव्हेंबर)


1. कोल्हापूर दक्षिण
2. ⁠सांगली - जत
3. ⁠सातारा- कराड दक्षिण
4. ⁠पुणे - खडकवासला/पर्वती


योगी आदित्यनाथ यांच्या सभांचे नियोजन ( बुधवार, 6 नोव्हेंबर)


1. वाशीम
2. ⁠मूर्तझापुर
3. ⁠मोझरी - तिवसा


ही बातमी वाचा: