नवी दिल्ली : कोल्हापूर, सांगली महापुराचा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. खासदार संभाजीराजेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी 8 देशांच्या राजदूतांसोबत बैठक झाली. यावेळी जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी छत्रपती संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. त्यानंतर सर्व देशांच्या राजदूतांनी पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे.

Sambhaji Raje | खासदार संभाजीराजे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले, बचावकार्यासाठी केंद्राकडे लष्कराची मागणी | ABP Majha



संभाजीराजे म्हणाले की, गेल्या शतकभरात इतका प्रलयकारी पूर पाहायला मिळाला नव्हता. राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या महापुरात जवळपास 30 लोकांना जीव गमवावा लागला. पशुधन आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संभाजीराजे म्हणाले की, दिल्लीत माझे चांगले आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा आगामी काळात महाराष्ट्राला फायदा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

Maratha Reservation | छत्रपती संभाजीराजे का संतापले? | नवी दिल्ली | ABP Majha