Ambadas Danve : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले आहे. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करुन, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरातच्या पाण्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले की, पाणी देण्यासाठी ज्याने आदेश दिले, विनंती केली त्याचा अर्ज असेल, त्याची चौकशी केली पाहिजे. पाणी देणे आणि असे काम करणे यात फरक आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी बुवा कर्मकांडांवर प्रहार केला आहे असे दानवे म्हणाले.
नाशिकच्या अशोक कऱात प्रकरणामुळं रुपाली चाकणकर यांना देखील राजीनामा देण्याची वेळ आली आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले की, यांच्याकडून एवढं सगळं झालं आहे. पक्षांच्या अध्यक्षांना निर्णय घेताना अजूनही मत ठरवावे लागत आहे. यातच सगळं सामावलेलं आहे. या व्यक्तींना कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकारी नाही असे दानवे म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याध्यक्षकांना मधल्या काळात सर्वाधिकार देण्यात यावे अशा पद्धतीने प्रफुल पटेल यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यावर केले. त्यामुळं आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले असेल असेही दानवे म्हणाले.
शंभूराज देसाई मंत्री असून एसपी तुमच्यावर हात उचलतो
सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यावर बोलताना दानवे म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांनी आदेशी दिले आहेत. IPS अधिकाऱ्याची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करायला पाहिजे होती. तसे आदेश पाहिजे होता. आदेश न दिल्याने अधिकाऱ्यांचे निलंबन होऊन नये, झालं नाही पाहिजे. अधिकाऱ्यांनाही बाजू मांडण्याचा संधी दिली पाहिजे. मला वाटत नाही उपसभापतीने आदेश दिले तरी ते निलंबित होतील असे दानवे म्हणाले. शंभूराज देसाई मंत्री असून तुमच्यावर तुमच्याच जिल्ह्याचा SP तुमच्यावर हात उचलतो. तुमच राहत काय? तुम्ही राहता कशाला? पाळीभर पाळीभर पाण्यात डुबन मेल पाहिजे असे दानवे म्हणाले.
ज्यांचे व्हिडीओ बाहेर आले ते सगळे मिळून अशोक खरातचा एन्काऊंटर करतील
खरातचे रोजचे कारनामे आणि व्हिडिओ बाहेर येत आहेत. प्रकरण किळसवाणे आहे. आणखी व्हिडिओ बाहेर येऊ नये, म्हणून ज्याचे असतील तेच सगळे मिळून अशोक खरात याचा एन्काऊंटर करतील असे दानवे म्हणाले. खासदारांची बैठक झाली याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, नियमित बैठक झाली आहे. ज्या बातम्या अफवा माध्यमांच्या माध्यमातून अफवा बाहेर येत आहे त्या सगळ्या खोट्या आहेत असे दानवे म्हणाले. पहिल्या दिवसापासून पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे. 99 टक्के ज्याची भागीदारी आहे तो आरोपी होत नाही. टक्क्यावाला आरोपी होतो. यातच सगळ आले आहे. सरकार पार्थ पवार याला वाचवत आहे. कोणीतरी कोर्टात जाईल किंवा आम्ही जाऊ दाद मागणार आहे असे दानवे म्हणाले.