Ambadas Danve on Ajit Pawar: पुण्यामधील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना गोखले बिल्डरच्या साथीत जैन बोर्डींग जमीन खरेदी करण्याचा डाव अंगलट आलेला असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यामध्येच जमिनी खरेदीवरून गंभीर आरोप झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज (6 नोव्हेंबर) थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाची जमीन तब्बल 1800 कोटींची असताना फक्त 300 कोटींमध्ये हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या व्यवहारासाठी अवघी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या (Ambadas Danve on Ajit Pawar)

अंबादास दानवे यांनी आज ट्विट करत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना चांगलंच घेरलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्यांचा दाखला देत अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं. मग तुम्हाला जमीन का फुकट लागते? असा बोचरा सवाल अजित पवारांना केला आहे. 1800 कोटींची जमीन असताना ती 300 कोटींमध्ये तुम्हाला का लागते? अशी विचारणा त्यांनी केली. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या, हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? (Ambadas Danve on Devendra Fadnavis)

अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात काय परिस्थिती आहे? देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे?  मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये देतात. अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला जमीन फुकट का लागते? अशी जमीन घेताच येत नाही. भूसंपादन झालेली जमीन परत कशी मिळते? महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळते? कोणता नियम पार्थ पवार यांनी पाळला, सर्व खुलासा पार्थ पवार यांनी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली. दादा महिनाभर मंत्रालयातील फाईल पुढे सरकत नाही. दोन दिवसात पार्थ पवारांची फाइल कशी सरकली? राज्याला लुटण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांचा राजकीय वापर केला असेल, ते नाकाने कांदे सोलतात त्यांनी याचे उत्तर द्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Continues below advertisement

आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे (Ambadas Danve accuses Parth Pawar) 

दुसरीकडे, दानवे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 1800 कोटींची जमीन  300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! 

27 दिवसात सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला (Mahar Watana land)

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500!

इतर महत्वाच्या बातम्या