पुण्यातील कोरगाव पार्कमधील महार वतनाची जागा तब्बल 1800 कोटींचे असताना अवघ्या 300 कोटींत 500 रुपयांची स्टॅम्पड्यूटीने खिशात घालून डल्ला मारणाऱ्या पार्थ पवार यांचा व्यवहार रद्द करण्याची वेळ आली. मात्र, या व्यवहारावरून अजित पवारांवरही विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. या व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णतः बॅकफुटवर गेले असून आपल्याला व्यवहाराचा काहीच माहिती नव्हतं असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, व्यवहारच रद्द झाल्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सडकून प्रहार केला आहे.
तर मग व्यवहार रद्द करण्याची वेळ कशी आली?
जर व्यवहार झालाच नव्हता तर तो रद्द करण्याची वेळ का आली? अजितदादांची या विषयांची वक्तव्य म्हणजे 'जोक ऑफ द डे' असल्याचा हल्लाबोल दानवे यांनी ट्विट करत केला आहे. दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली. अजितदादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे 'जोक ऑफ द डे' आहेत. इतरवेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल. डबल इंजिनकी सरकार, भ्रष्टाचार करेंगे धुवांधार.
सरकारी जमीन असून तिचा व्यवहार होऊच शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या