नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2017 08:05 AM (IST)
29 एप्रिलला अहमदनगरच्या खर्डा गावात दलित तरुण नितीन आगेची अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती.
अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयानं निर्णय दिला. 29 एप्रिलला अहमदनगरच्या खर्डा गावात दलित तरुण नितीन आगेची अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती. 10 वीतील नितीन आगेचे शाळेतल्याच एका मुलीशी प्रेमसंबंध जुळल्याची माहिती होती. नितीन आणि त्या मुलीला शाळेतच बोलताना मुलीच्या भावानं पाहिलं. यानंतर नितीनला शाळेतील घंटा मारण्याच्या हातोड्यानं मारहाण करण्यात आली. गरम सळईचे चटके देण्यात आले आणि डोंगरावर नेऊन त्याला मृतदेह झाडाला लटकण्यात आला. संबंधित बातमी : कहाणी नितीनच्या खर्ड्याची, कसं आहे नितीन आगेचं खर्डा गाव?