Maharashtra: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच तापलाय .विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे .कमाल तापमानाचा पारा तिथे 40 ते 41 अंशावर जाऊन पोहोचला आहे .नागरिकांना उन्हाचा तडाखा आणि अंगाची लाही लाही याचा एकत्रित अनुभव येतोय .विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे . (Temperature)आज दिनांक 15 मार्च रोजी अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .तर नागपूर वर्धा अमरावती जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे . अकोल्यात 41.5°c तापमानाची आज नोंद झाली .राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात 41.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले . (Heat Wave)


उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रही चांगला तापला आहे .हवामान विभागाच्या विशेष तापमान अहवालानुसार,कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या विभागांमध्ये तापमान सामान्य होऊन अधिक नोंदवले गेले आहे. सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी तापमान 40° वर होते . दरम्यान कर्नाटक राज्यात काही भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या जिल्ह्यात विखुरलेल्या ढगांचे प्रमाण दिसून आल्याचे के एस होसळेकर यांनी सांगितले . कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचे सांगण्यात आले .तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .


 






आज कुठे किती तापमानाची नोंद झाली ?


चंद्रपूर - 41.4°C, सोलापूर - 41.1°C, वर्धा - 41.0°C, अकोला - 40.9°C, अमरावती - 40.6°C, नागपूर - 40.4°C, यवतमाळ - 40.0°C, वाशीम - 39.8°C, परभणी - 39.8°C, जळगाव - 39.5°C, गडचिरोली - 39.4°C, सांगली - 39.2°C, पुणे - 38.7°C, छत्रपती संभाजीनगर - 38.7°C, जालना - 38.6°C, लातूर - 37.8°C, बुलढाणा - 37.6°C, गोंदिया - 37.6°C, अहमदनगर - 37.9°C, सातारा - 37.9°C, नाशिक - 36.3°C, पालघर - 35.0°C, मुंबई उपनगर - 34.5°C, मुंबई शहर - 33.0°C.


पुढील पाच दिवस कसे राहणार तापमान?






पुढील 5 दिवसांत कोकण-गोवा भागात कमाल तापमान 2-3°C ने घटण्याची शक्यता असून, किमान तापमानात मोठा बदल होणार नाही. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान स्थिर राहील, तर उत्तरी भागात किमान तापमान 1-2°C ने कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 3 दिवस तापमान स्थिर राहील आणि त्यानंतर किंचित घट होईल.


हेही वाचा: