Akola Urea Shortage : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी अक्षरशः हाहाकार उडालाय. आज (10 जून) सकाळी नऊनंतर अकोट (Akot) मधील कृषी बाजारपेठ उघडलीय. या ठिकाणी लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगांना नियंत्रण करण्यासाठी थेट पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलाय. खरिपासाठी युरिया (Akola Urea Shortage) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच कृषी केंद्रान बाहेर मुक्काम ठोकलाय. युरिया मिळवण्यासाठी कृषी केंद्रान बाहेर शेतकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढलीय. आता दुकान उघडल्यानंतर शेतकऱ्यांची एकच झुंबड कृषी केंद्र बाहेर पाहायला मिळते. काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वादही होताना दिसतेय. त्यामुळेच प्रशासनाने आता अकोट मधील कृषी केंद्रात बाहेर थेट पोलीस कमांडोंचा बंदोबस्त लावलाय.

Akola Urea Fertilizer Shortage: राज्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच रांगा? शेतकऱ्यांचासंताप! पहाटे 3 वाजल्यापासूनरांगा

राज्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच रांगा आहेत का? कधी स्वतःला 'बळीराजा' म्हणवणारा शेतकरी कर्जमाफीसाठी थंब देण्यासाठी रांगेत असतोय, तर कधी त्याला बियाणं घेण्यासाठी आणि खत घेण्यासाठी रांगेत उभं रहावं लागतंय. मोदी सरकारच्या 'डिजिटल इंडिया'तील सरकारी अनास्थेचा हा पंचनामा करणारा 'माझा चा 'ऑन दी स्पॉट' रिपोर्टमधूनवास्तवसमोरआलंआहे. अकोल्यात अकोला जिल्ह्यातील अकोटचं कृषी मार्केटमध्येपहाटे 3 वाजल्यापासूनरांगाबघायला मिळाल्याआहे. प्रत्येकाची लगबग होतीती स्वतःचा नंबर लावण्यासाठी. कारण, प्रत्येकाला आपल्या शेतातील खरीप हंगामासाठी युरिया हवाआहे. यासाठी नंबर लागणार की नाही?, यातून हे शेतकरी रात्रीपासूनच कृषी केंद्र बाहेर आपला नंबर लागण्यासाठी धडपडत आहेत.

Akola News : महायुती सरकार खरंच शेतकऱ्यांपती संवेदनशील आहे का? शेतकऱ्यांचा सवाल

दरम्यान, रात्री तीनच्या अंधारात सुरू झालेला खत मिळवण्यासाठीचा संघर्ष सकाळी झुंजूमुंजू झालं तरी सुरूच होता. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्याय. त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांनाही पाचारण करावं लागलं होतं. मात्र जिल्हा प्रशासनाने यानंतरही कोणतीच खबरदारी न घेतल्याने आजही तीच परिस्थिती अकोटमध्ये दिसतीये. शेतकऱ्यांचा सरकार असणारा दावा करणाररं महायुती सरकार खरंच शेतकऱ्यांपती संवेदनशील आहे का?, हाच प्रश्न यातून निर्माण होतेय.

Akot News : शेतकऱ्यांनी कृषी केंद्राबाहेर काढली रात्र जागून, रांगेत शेतकऱ्यांच्या हातावर लिहिण्यात आले नंबर

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी कृषी केंद्राबाहेर शेतकऱ्यांना रात्र जगाहून काढावी लागलीय. 'एबीपी माझा'ने अकोटमधील हे भयान वास्तव महाराष्ट्रासमोर आणलेय. युरिया मिळावा यासाठी 75 वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्यांपासून बारा वर्षाच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा रांगीमध्ये समावेश आहेय. कृषी केंद्र बाहेर रात्र जागून काढावी लागली तरी तेथे व्यवस्था मात्र कोणतीही करण्यात आलेली नाहीय. रांगेत नंबर लावण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होतानाही दिसत आहेत.

ABP Majha on Urea Fertilizer Shortage: एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागं

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया वाटपातील प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासन ताळ्यावर आलंय. कृषी केंद्रावर सरकारने कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कुपन वाटप करण्यातआलाआहे. अकोटमधील कृषी केंद्रात बाहेर युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जागून अख्खी रात्र काढली. आज सकाळपासून एबीपी माझाने सातत्याने ही बातमी महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालंआहे.

Akot News : अकोटमध्ये कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी अक्षरशः हाहा:कार उडालाय. युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अख्खी रात्र कृषी केंद्राबाहेर जागून काढलीय. या संपूर्ण परिस्थितीमुळे शेतकरी सैरभैर आणि संतप्त झालेय. या परिस्थितीतही एक सुखद अनुभव या गर्दीच्या ठिकाणी आलाय. रांगेतील शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्रांच्या मालकांनी नाश्त्याची व्यवस्था केलीय. रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी केंद्र संचालकांनी सकाळी नाश्त्यासाठी पोह्यांचा वाटप केलय.

इतरमहत्वाच्याबातम्या