अकोला : अकोल्यामध्ये काही प्रतिष्ठित घरातल्या मुलांना चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक तर नॅशनल लेव्हलचा कराटेपटू आहे. कॉलेजात शिकण्याच्या वयात या मुलांना आता जेलची हवा खावी लागणार आहे.


श्रेयस ठाकरे आणि अक्षय मसने हे दोघेही चांगले मित्र. प्रतिष्ठित घरातली ही विशीतली मुलं. यांची अजूनन एक ओळख म्हणजे... हे दोघेही चोर आहेत.

बाईक चोरणे हा यांचा छंद.. बाईक चोरायची.. तिची नंबर प्लेट बदलायची.. काही दिवस चालवली, की ग्राहक बघून 25-30 हजारात विकून टाकायची..

आलेल्या पैशात मजा करायची... पैसे संपले की दुसरी बाईक चोरायची... अशा प्रकारे बाईक चोरण्याचा विचित्र छंद जोपासणाऱ्या या दोन्ही मुलांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे.

श्रेयस ठाकरे हा नॅशनल लेव्हलचा कराटेपटू आहे. नेपाळमधे झालेल्या कराटे स्पर्धेत त्यानं पदकंही मिळवली आहेत. असं सगळं असताना श्रेयसला चोरी करावीशी का वाटली? कराटे सोडून चोरीची प्रॅक्टीस करुन श्रेयसला कोणता आनंद मिळायचा, हे त्याचं त्यालाच ठाऊक.

ओळखीतील व्यक्तीच्या दुचाकीची बनावट चावी ते बनवायचे आणि चोरायचे. त्यामुळे आपल्याच लोकांकडून या पोरांनी केवढा राग आणि रोष ओढवून घेतलाय, याची कल्पनाही करवत नाही.