Akola Crime News : आता महाराष्ट्रात देखील झॉम्बी ड्रग्ज संदर्भात धक्कादायक प्रकरणे उजेडात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नागरिकांमध्ये भीतीचे पसरले वातावरण पसरले आहे. अशातच अकोल्यात 'ड्रग्ज'ची पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज'चं जप्त केलं आहे. ज्याची किंमत 13 लाख 80 हजार इतकी आहे.
Continues below advertisement
अकोल्यातीलं सिव्हिल लाईन हद्दीतील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे एक व्यक्ती 'ड्रग्ज' विक्रीसाठी आला होता. मोहम्मद शफीक मोहम्मद जहीर शेख असं या व्यक्तीच नाव आहे. तो मुळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेत 68.43 ग्रॅम 'ड्रग्ज' जप्त करण्यात आलं आहे. एकत्रित 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील आतापर्यंत अकोला पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. 'ड्रग्ज' विक्रीसंदर्भातील मुख्य टोळीचा अकोला पोलिसांकडून होणार लवकर पर्दाफाश करण्यात आला आहे.
मुंबईतील नेस्को ड्रग पार्टी प्रकरणात नवनवीन खुलासे
मुंबईतील नेस्को
ड्रग पार्टी प्रकरणात नवनवीन खुलासे होतायत . या खुलाशांमुळे अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांचं प्रमाण किती वाढीस लागलंय हे समोर येतंय . नव्या पिढीच्या एन्जोयमेंटच्या संकल्पना बदलतायत . ज्यामुळं पार्टी म्हणजे
ड्रग हे जणू समीकरणच बनत चाललंय . मेफेड्रोन आणि फ्यांटानील यासारखी सिंथेटिक
ड्रग्ज सहज सहज उपलब्ध होत असल्यानं पार्टीच्या नावाखाली नशेचा धोका हातपाय पसरू लागल्याचं दिसून येतंय. नेस्को
ड्रग पार्टीत प्रकरणाने तरुणाई भोवती नशेचा विळखा किती घट्ट होत चाललाय हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय . अंमली पदार्थांच्या या वाढत्या धोक्यास तरुणाईच्या पार्टी आणि एन्जॉयमेंट बद्दलच्या बदललेल्या संकल्पना कारणीभूत असल्याचं जाणकारांचं म्हणणंय . पार्टी म्हणजे दारू हा समज मागच्या पिढीचा होता , आताच्या पिढीचा कल पार्टीत वेगवगेळ्या प्रकारची
ड्रग ट्राय करण्याकडे असतो असं या मुलांकडूनच सांगण्यात येतं असं पुण्यातील मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालिका डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांचं म्हणण आहे.
भारतात सध्या मेफेड्रोन आणि फ्यांटानीलचा वापर पार्टी ड्रग्ज म्हणून वाढीस लागलाय . एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी योरोपमध्ये हे अंमली पदार्थ युरोपीय देशांमध्ये पार्टी स्टिम्यूलॅन्ट म्हणून वापरायला परवानगी होती . एवढंच नव्हे तर हे पदार्थ कोणालाही ऑनलाईन खरेदी करण्यासही पाश्चत्य देशात मुभा होती . मात्र या पदार्थांचा धोका हळूहळू लक्षात येऊ लागला आणि 2010 साली युरोपीय युनियनने या ड्रग्जवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला . मात्र आता भारतात या अमली पदार्थांना पार्टी ड्रग म्हणून स्वीकारलं जातंय . पार्टीतील म्युझिक आणि लाईट्स यांचा परिणाम या ड्रग्जमुळे वाढतो आणि नशा करणाऱ्यांना आणखी उत्तेजित झाल्यासारखं वाटतं . मात्र शेवटी याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत . नेस्को ड्रग पार्टीत ओव्हर डोसमुळं दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य समोर आलंय. त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये रस्यावर नशेच्या आहारी गेलेल्या एक झोंबी सदृश्य व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अंमली पदार्थांचं आव्हान किती मोठय हे अधोरेखित झालय. मेफेड्रोन आणि फेंटानील सारखे अंमली पदार्थ कृत्रिमरीत्या तयार करता येत असल्यानं ते सहज उपलब्ध होतायत . कोकेन किंवा हेरॉईनच्या तुलनेत त्यांची किंमत देखील कमी आहे . मात्र त्यामुळं धोका मात्र कित्येक पटींनी वाढलाय .
Continues below advertisement